पिंपरी, ता. ९ ः भोसरी एमआयडीसी परिसरातील अंतर्गत बस वाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ९) पीएमपीएमएल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर, उपाध्यक्ष जयश्री साळुंखे, तसेच दुर्गा ब्रिगेडच्या वतीने उपाध्यक्ष रईसा पठाण, संघटक मोहसीना शेख आदी उपस्थित होते.
भोसरी एमआयडीसी परिसरात सुमारे ७६ किमी अंतर्गत रस्ते व २२ औद्योगिक ब्लॉक्स असून, दररोज अंदाजे दोन ते तीन लाख कामगार ये-जा करतात. मात्र, अंतर्गत बससेवा उपलब्ध नसल्यामुळे कामगारांना, विशेषतः महिला कामगारांना रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरक्षित वाहतुकीच्या अभावामुळे त्यांना लांब अंतर पायी प्रवास करावा लागतो आणि अनेकवेळा गौरकृत्याच्या घटनांनाही सामोरे जावे लागल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर दिघी ते एमआयडीसी, निगडी ते एमआयडीसी (नाशिक फाटा मार्गे) तसेच पिंपरी ते एमआयडीसी हे अंतर्गत बस मार्ग तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.