पिंपरी-चिंचवड

मद्यपान करून दुचाकी चालविल्याने शिक्षा

CD

पिंपरी, ता. ३ : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. योगेश देविदास माळी (रा. विठ्ठल मंदिराजवळ, हिंजवडी गावठाण) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंजवडीमध्ये गेल्या वर्षी २५ जूनला रात्री नऊच्या सुमारास तो मद्यपान करून दुचाकीवरून जात असल्याचे वाहतूक पोलिसांना आढळले. त्यानुसार हिंजवडी वाहतूक विभागाने मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई केली. त्यानंतर शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात खटला भरण्यात आला. या प्रकरणाची सोमवारी (ता. २) सुनावणी झाली. माळीचा वैद्यकीय चाचणी अहवाल ग्राह्य धरून मोटार वाहन कायदा कलम १८५ व १३० (१)/१७७ प्रमाणे त्यास दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाने मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे १५ दिवस साधा कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास आणखी दहा दिवसांचा कारावास तसेच मोटार वाहन कायदा कलम १३० (१) /१७७ प्रमाणे पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT