पिंपरी-चिंचवड

वाहन योग्यता प्रमाणपत्राची नोंदणी प्रक्रिया बंद

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील स्वयंचलित चाचणी केंद्रे वगळता राज्यातील इतर स्वयंचलित केंद्र अद्याप सुरू झालेली नाहीत. तरीही परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांतील योग्यता प्रमाणपत्रांची जुनी नोंदणी प्रक्रिया (संकेतस्थळावरून अपॉइंटमेंट) बंद केली आहे. त्यामुळे धोकादायक वाहने रस्त्यावर धावत असून महसूलही बुडतो आहे. वाहनचालक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी तयार आहेत. मात्र, प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे शासकीय यंत्रणा नक्की करतेय काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
वाहनांचे अपघात कमी करणे आणि त्यांची अचूक तपासणी करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने राज्यात स्वयंचलित चाचणी केंद्रे उभारण्याची घोषणा केली होती. परिवहन विभागाने पिंपरी चिंचवडसह राज्यातील ५२ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित चाचणी केंद्रे प्रकल्पांना मंजुरी दिली होती. २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून तीन खासगी कंपन्यांना काम दिले होते. २०२५ पर्यंत कामाची मुदत होती. सर्व तपासण्या स्वयंचलित यंत्रांद्वारे होणे अपेक्षित होते. मात्र, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग वगळता अन्य केंद्राचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे मानवी चाचणीच्या आधारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम सुरू होते. तेही एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने बंद केले होते. वाहतूक संघटनांच्या मागणीनंतर एक महिन्याची मुदतवाढ दिली. आता एक मार्चपासून पुन्हा अपॉइंटमेंट बंद झाल्या आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नोंदणीसाठी वाहनचालकांना आरटीओत हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यन, संकेतस्थळावरच नोंदणी होत नसल्याने अधिकारीही हतबल झाले आहेत.

वाहनचालकांना भुर्दंड
व्यावसायिक संवर्गातील रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक इत्यादी प्रकारच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास (पासिंग) विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये दंड आकारण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०१७ मध्ये घेतला होता. याबाबत मुंबई बस असोसिएशन आणि पुण्यातील रिक्षा संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. १८ मे २०२४ पर्यंत निर्णयाला स्थगिती होती. त्यावरील स्थगिती उठवल्याने राज्यात निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानुसार पासिंगसाठी उशिर केल्यास प्रतिदिन ५० रुपये दंड आकारला जात आहे. आता अपॉइंटमेंटच बंद असल्याने वाहनचालकांना आर्थिक भूर्दंड बसणार आहे.
-----
स्वयंचलित केंद्रांचे काम पूर्ण झाले नसताना सक्ती का? काम पूर्ण होईल तेव्हा नोंदणी प्रक्रिया बंद करायचे सोडून अगोदर नोंदणी बंद करून वाहन चालकांना वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे. परिवहन विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका वाहनचालकांना बसत आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT