पिंपरी-चिंचवड

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या , चौथ्या  मार्गिकांना गती

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ ः पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या  आणि  चौथ्या  मार्गिकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे ५,१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळेल. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा केला होता.
 केंद्र सरकारने २०१४-१५ मध्ये या दोन मार्गिकांची घोषणा केली. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला. त्यासाठी २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद होती, परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च २१०० कोटी होता. २०२२ मध्ये खर्च २२०० कोटी रुपयांवर गेला. आता हा आकडा साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यात भूसंपादनासह सर्व कामांचा समावेश आहे. केंद्रीय रेल्वे विभाग  आणि  राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च करतील. राज्याच्या ५० टक्यांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांचाही वाटा असेल.
हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवडहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी जास्त गाड्यांची सुविधा उपलब्ध होईल. नोकरदारांना कामावर वेळेवर पोहोचता येईल. त्यांची लेटमार्कपासून सुटका होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
----------

 पुणे आणि लोणावळा दरम्यान वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका टाकण्यासाठी अर्थसंकल्पात सुमारे ५,१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा लोणावळा, पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे परिसरातील प्रवाशांना होणार आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT