सोमाटणे, ता. ९ ः ना हरकत प्रमाणपत्र व मासिक सभेच्या ठरावाची खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी चांदखेड ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास संमती देण्यात आली आहे. अधिकारी संभाजी जगताप यांनी सरपंचांची सही नसलेल्या लेटरपॅडचा वापर करून ना हरकत प्रमाणपत्र व १५-५-२०२५च्या मासिक सभेच्या ठरावाचे खोटे पत्र घेऊन ते वरिष्ठांना सादर केले होते. ही बाब समजताच सरपंच मिना माळी यांनी संबंंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मावळच्या गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्जाद्वारे संमती मागितली होती. या अर्जाचा विचार करून गटविकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास संमती दिली. यामुळे पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सरपंच मिना माळी यांनी दिली.
-------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.