पिंपरी, ता. २९ : भगवान महावीर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त अहिंसा पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या वर्षी हा पुरस्कार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, एम ए हुसेन, डॉ. मनोज देवळेकर आणि आनंद पिंपळकर यांना दिला जाणार आहे.
शाकाहारी व्यक्ती तसेच ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, अशा व्यक्तींना गेल्या अनेक वर्षांपासून महासंघाच्या वतीने अहिंसा पुरस्कार प्रदान केला जातो, अशी माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, उमेश पाटील, विलासकुमार पगारिया, श्रेयस पगारिया यांनी दिली. येत्या मंगळवारी (ता.३१) महावीर जयंतीच्या औचित्याने निगडीतील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.