पिंपरी-चिंचवड

पवनमावळात नुकसानभरपाईची मागणी

CD

सोमाटणे, ता. ३ : पवनमावळ परिसरात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. पवनमावळ पूर्व भागांत गुरुवारी (ता. २) दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे कांदा व गहू पूर्ण भिजला. तसेच भाजीपाला, फुलशेती, बाजरी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीमालाचे संरक्षण करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही, त्यामुळे नुकसान अधिक वाढले. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सुभाष धामणकर (उर्से), सुरेश राक्षे (सांगवडे), संजुकुमार बोडके (गहुंजे), हनुमंतराव मुऱ्हे (सोमाटणे), दिलीप राक्षे (साळुंब्रे), बाळासाहेब केदारी (कुसगाव) आदींनी केली आहे.
---

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT