पिंपरी-चिंचवड

अतिक्रमणमुक्त पदपथांना मुहूर्त

CD

पिंपरी, ता. ६ ः महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील विविध अंतर्गत भागांत पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी एक मेपासून अतिक्रमणमुक्त पदपथ पंधरवडा मोहीम सुरू केली आहे. १५ मेपर्यंत कारवाई सुरू राहणार आहे.
महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत आजपर्यंत फ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील आरटीओ रस्ता, त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक, देहू-आळंदी रस्ता, चिखलीतील सत्संग रस्ता ते पिंगळे चौक; इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आळंदी रस्ता, भोसरी नाट्यगृह परिसर; ड क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील रहाटणी परिसरात जगताप डेअरी ते पिके चौक, कुणाल आयकॉन रोड व गोविंद गार्डन परिसर; ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दिघीतील पुणे-आळंदी रस्त्यावर कारवाई झाली आहे. त्यातून टपऱ्या, हातगाड्या, प्लॅस्टिक कॅरेट, लोखंडी रॅक, स्टँड बोर्ड, खुर्च्या, टेबल, इलेक्ट्रिक काटे, स्टँडी बोर्ड, छत्र्या, कूलर, हातगाड्या, पाणीपुरी ठेले, प्लास्टिक कॅरेट; कपडे व चप्पलांचे गाठोडे जप्त केले. टोमॅटो, भेंडी, बटाटा, काकडी, मिरची, आंबे, केळी व नारळ असा भाजीपाला जप्त करून इस्कॉन अन्नामृत अन्नछत्रात जमा केला.

नागरिकांना आवाहन
महापालिकेने जप्त केलेले सर्व साहित्य संबंधित गोदामात जमा केले आहे. नागरिकांनी सार्वजनिक रस्ते व पदपथ मोकळे ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास आणि पादचाऱ्यांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध होण्यास मोठी मदत होत आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT