पिंपरी-चिंचवड

आई राजा उदो उदो । सदा नंदीचा उदो उदो ।।

CD

आकुर्डी, ता. ८ : आकुर्डीची ग्रामदेवता, श्री तुळजाभवानी देवीच्या ग्रामप्रदक्षिणेचा सोहळा मंगळवारी (ता.७) कोजागरी पौर्णिमेला अतिशय थाटामाटात, भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने संपूर्ण आकुर्डी गाव भक्तिभाव आणि आनंदाने न्हाऊन निघाले.
या ग्रामप्रदक्षिणेची सुरुवात मंगल कलश यात्रेने झाली. महिलांच्या समूहांनी डोक्यावर कलश घेऊन पारंपरिक झिम्मा, फुगडी, लेझीम आणि टाळवादनाच्या तालावर देवीचे गुणगान केले. जय भवानी, जय तुळजाभवानीच्या जयघोषांनी आकुर्डीचे वातावरण दुमदुमले. विविध ढोल-ताशा पथकांनी केलेल्या सादरीकरणामुळे ग्रामप्रदक्षिणेचा प्रत्येक टप्पा भक्ती आणि चैतन्याने भरून गेला.
प्रदक्षिणेदरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थांनी देवीचे औक्षण करून अगत्यपूर्वक स्वागत केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो भाविकांनी उभे राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनीच मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. आणि आकुर्डीचा प्रत्येक कोपरा देवीच्या जयघोषांनी आणि फुलांच्या वर्षावाने नटला. देवीच्या मंदिर परिसरात संध्याकाळी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी दिव्यांची झगमगाट पाहायला मिळाली. त्यानंतर आरतीच्या मंगलध्वनीने वातावरण भक्तिरसात आणखी न्हाऊन गेले. झाली. ‘आई राजा उदो उदो’...च्या मंगलघोषाने वातावरण भारावले. तसेच विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघाले.
त्यानंतर आरतीच्या मंगल ध्वनीने वातावरण अधिक पवित्र बनले. यंदाची सुवर्ण महोत्सवी ग्रामप्रदक्षिणा ही आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ५० वर्षांची अखंड परंपरा आम्ही साजरी करत आहोत. या सोहळ्याने गावातील एकता, संस्कृती आणि भक्तीचा सन्मान केला आहे. ग्रामस्थ, महिला मंडळे आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. तुळजाभवानी देवीच्या कृपेने आकुर्डी गाव नेहमी सुख, समृद्धी आणि शांतीने नटलेले राहो हीच प्रार्थना, असे तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.

एकता, भक्तीचा संदेश
आमच्यासाठी हा फक्त धार्मिक कार्यक्रम नव्हे; तर एक सांस्कृतिक उत्सव आहे. यानिमित्ताने सर्व वयोगटांतील लोक एकत्र आले आणि गावात एकतेचा, भक्तीचा सुंदर संदेश पसरल्याची भावना महिला वर्गाने व्यक्त केली.

RVT25A00035, RVT25A00036

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: रोहित शर्मा, विराट कोहली कर्णधार शुभमन गिलसह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? प्रवासाच्या तारखा आल्या समोर

Pulse Polio Vaccination : रविवारी ३ लाख बालकांना मिळणार ‘दो बॅुंद जिंदगी के’

Navi Mumbai Airport: दि. बा. पाटलांच्या नावाची घोषणा नाहीच! प्रकल्पग्रस्तांच्या उत्साहावर विरजण

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

Latest Marathi News Live Update : शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी शाळेला ठोकलं टाळं

SCROLL FOR NEXT