पिंपरी-चिंचवड

विद्युत कर्मचाऱ्यांच्या हातांना आता सुरक्षेचे भक्कम बळ

CD

संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
रावेत, ता.२४ : तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महावितरण कंपनीने केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘टी ॲण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’ ही डिजिटल व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने वेळेत मिळणे शक्य होणार आहे. या प्रणालीने कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सुरक्षेला नवे बळ मिळाले असून विद्युत देखभाल कामे अधिक सुरक्षित पद्धतीने पार पाडणे सुलभ होणार आहे.
विद्युतविषयक कामांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणकडून आपल्या कर्मचाऱ्यांना २० ते २५ प्रकारची सुरक्षा साधने दिली जातात. त्यात इन्सुलेटेड ग्लोव्हज, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, व्होल्टेज डिटेक्टर, इन्सुलेटेड रॉड, सेफ्टी शूज, फेस शिल्ड, अर्थिंग चेन आदी प्रमुख साधनांचा समावेश आहे. ही साधने विशेषतः लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्यातील योग्य सुरक्षा साधनांचा वापर अत्यावश्यक असतो. मात्र पूर्वी सूचना पुस्तिका (मॅन्युअल) नोंदींमुळे साधनांच्या उपलब्धतेत विलंब होत असल्याची बाब महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्वतंत्र ‘टी ॲण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’ नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.

काय आहे मॉड्यूल ?
- टी ॲण्ड पी म्हणजेच टूल्स ॲण्ड प्लांट रजिस्टर मॉड्यूल
- हे मॉड्यूल महावितरणच्या अंतर्गत तांत्रिक प्रणालीचा एक भाग
- वैयक्तिक, सामाईक सुरक्षा साधने तांत्रिक कर्मचाऱ्यांना वेळेत देण्याचा उद्देश
- सुरक्षा साधनांची नोंद, उपलब्धता, मागणी आणि वितरण यावर ‘रिअल-टाइम’ नियंत्रण ठेवणे शक्य
- कोणत्या विभागात कोणते साधन उपलब्ध आहे किंवा तातडीने देणे आवश्यक आहे, याची माहिती तत्काळ मिळते
- उपकरणांच्या उपलब्धतेचा मागोवा घेणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य
- आयटी यंत्रणेकडून मॉड्यूलची हाताळणी

गरज ओळखून विकास
सुरक्षा उपकरणांसाठी आतापर्यंत पारंपरिक कागदपत्रांवर आधारित प्रक्रियेद्वारे विनंती अर्ज दिले जात होते. मात्र त्यात खरेदी आणि पुरवठ्यात अनेकदा विलंब होत असे. सुरक्षा साधनांची निकड आणि गंभीर गरज ओळखून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘टी ॲण्ड पी’ ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले होते.

आवश्यक साधने वेळेत मिळाल्याने आमचा काम करताना आत्मविश्वास वाढतो. सुरक्षिततेची हमी मिळाल्याने अपघाताचा धोका कमी झाला आहे. तसेच दर सोमवारी सुरक्षा शपथ घेत असल्याने आम्हा सर्वांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत सजगता निर्माण झाली आहे.
- एक लाईनमन


‘टी ॲण्ड पी’ डिजिटल प्रणालीमुळे सुरक्षा साधनांचे व्यवस्थापन अधिक सक्षम झाले आहे. आवश्यकतेनुसार तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांची ऑनलाइन मागणी नोंदविता येत आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शून्य विद्युत अपघात हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्युत सुरक्षेबाबत कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यात दर सोमवारी उपविभाग व शाखा कार्यालयातील अभियंता, जनमित्र विद्युत सुरक्षेची शपथ घेऊन कामाला प्रारंभ करीत आहेत.
- राजेंद्र पवार, संचालक (मनुष्यबळ विकास), महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

SCROLL FOR NEXT