पिंपरी-चिंचवड

कासारसाई धरणामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

CD

तळेगाव दाभाडे, ता.२३ : कासारसाई (कुसगाव) धरणामध्ये बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला. मंगळवारी पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले.
माधव हरगौरी सिंग (वय १७, रा. सातपूर, आंबडलिंक रोड, ता.अंबड, जि. नाशिक) असे मृत तरूणाचे नाव आहे. 
नाशिक येथून हिंजवडी येथे परीक्षेसाठी आला होता. परीक्षा झाल्यानंतर आतेभाऊ याच्याबरोबर मित्राच्या सांगण्यावरून तो कासारसाई (कुसगाव) धरणावर बोटिंग करण्यासाठी व धरण पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी, माधव हरगौरी सिंग हा पाण्यात उतरला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो सोमवारी पाण्यात बुडाला. शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक  अजय लोहेकर आणि  अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी सायंकाळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ, आपदा मित्र (चाकण) या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते  नीलेश गराडे, अनिल आंद्रे, विनय सावंत, शुभम काकडे, अवी कारले, प्रथमेश सुपेकर, रमेश कुंभार, वैभव वाघ, गणेश गायकवाड, आशिष बोडके यांनी माधव याला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, अंधार झाल्यानंतर शोधकार्य थांबवावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवेत उडणाऱ्या विमानात अचानक वाजला फायर अलार्म, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग...नेमकं काय घडलं?

Vinod Tawde Interview : मोदींविरोधात मुद्देच नाहीत;विनोद तावडे ,‘एनडीए’ ४०० पार जाईल

Nayak 2: पुन्हा येतोय नायक ? अनिल-राणीच्या एकेकाळी गाजलेल्या सिनेमाबाबत निर्मात्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Sakal Podcast : मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कोण बाजी मारणार? ते राज ठाकरेंना मोदींकडून सात अपेक्षा

Delhi Liquor Scam : ‘आप’ अन् केजरीवाल दोघेही आरोपी; न्यायालयामध्ये ‘ईडी’कडून आठवे आरोपपत्र

SCROLL FOR NEXT