पिंपरी-चिंचवड

दुचाकीवरुन पाठलाग करत गंठण लांबविले

CD

तळेगाव दाभाडे, ता.२९ ः लग्न लावून घरी जाताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवल्याच्या दोन घटना कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडल्या. यात दोघा चोरट्यांनी आठ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले.
नायगाव हद्दीतील घटनेची फिर्याद लता हरिभाऊ मावकर (वय ३७ रा. दहिवली ता.मावळ) यांनी तर पाथरगाव हद्दीतील घटनेची फिर्याद मंगल लालू गरुड (वय ४५ रा.भाजे ता.मावळ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करण्यासाठी तसेच आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना केले.
पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लता मावकर व मंगल गरुड या हिरकणी मंगल कार्यालयात लग्न समारंभाला आल्या होत्या. लग्न लावून दुचाकीवरून घरी जाताना २० ते २५ वर्षे वयातील दोघा अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर मागे बसलेल्या फिर्यादीच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेले. त्यात, फिर्यादी दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाल्या. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे फरार झाले. मावकर यांचे ५ लाख ५२ हजार रुपयांचे गंठण; तर गरुड यांचे ३ लाख १० हजार रुपयांचे गंठण हिसकावून नेले.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सध्या लग्नसराई सुरू असून महिलांनी अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरताना सावधान राहावे. कोणी पाठलाग करत असल्याचा संशय आल्यावर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ नंबरवर कॉल करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Mumbai Local : कसारा मार्गावरील गर्दीला अखेर दिलासा; सप्टेंबरपासून १५ डब्यांच्या लोकलचा होणार विस्तार

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

SCROLL FOR NEXT