तळेगाव दाभाडे, ता. २७ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील महिलांना आतापर्यंत सुमारे १४ कोटी रुपये जमा झाले होते. आता शासन आदेशानुसार चौकशीअंती २ हजार ६०७ महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
तालुक्यात या योजनेअंतर्गत ९६ हजार ९६८ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी ९४ हजार ३६१ अर्जांना मंजुरी मिळाली. गेल्या वर्षी पहिल्या फेरीत ४७ हजार महिलांच्या बॅंक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले होते. तोपर्यंत अनेक महिलांनी हा अर्ज भरला नव्हता. पण, जसे इतरांच्या खात्यावर पैसे जमा झाले तसे उर्वरित महिलांनीही हा अर्ज भरण्यासाठी तसेच बॅंकांत खाते उघडण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर अर्ज भरणाऱ्यांचा आकडा तब्बल ९६ हजार ९६८ वर गेला. त्यातील ९४ हजार ३६१ अर्जांना मंजुरी मिळाली.
पैसे परत घेण्याची भीती
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पडताळणी करण्याचे शासनाने जाहीर केले. त्यावेळी अनेक गरजू नसलेल्या महिलांच्या खात्यावर जमा जालेले पैसे परत द्यावे लागतील काय, या बाबत चर्चा सुरू होती. मात्र, दिलेली रक्कम परत घेणार नसल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ही धास्ती कमी झाली.
जास्त उत्पन्न असणे, कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहन, आयकर भरणे, रेशन कार्ड नसणे अशा विविध कारणांमुळे चौकशीअंती २६०७ महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.
- विशाल कोतागडे, प्रकल्प अधिकारी, मावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.