पिंपरी-चिंचवड

तळेगाव नगरपरिषदेत इंटर्नशिपची संधी

CD

तळेगाव दाभाडे, ता. २८ : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत देशातील उच्च ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवक- युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तळेगाव दाभाडे शहरातील २१ ते २४ वयोगटातील युवक-युवतींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून दहावी बारावी, आयटीआय, पदवीधर असणे आवश्यक आहे. ‘पीएम इंटर्नशिप’ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात ४ हजार १४५ जागा उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी १२ महिने असेल. ज्यामध्ये पाच हजार रुपये दरमहा मानधन, तसेच एकरकमी सहा हजार रुपये आणि विमा सुविधा दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील ‘एनयूएलएम’ कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

अशी आहे नोंदणी प्रक्रिया
लाभार्थींनी https://pminternship.mca.gov.in/login या संकेतस्थळावर जाऊन ३१ मार्चपूर्वी आपली नोंदणी करावी. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीची आवश्यक माहिती व मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT