पिंपरी-चिंचवड

महावीर जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० : भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व जैन सोशल ग्रुप यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात ७० जणांचे डोळे तपासून त्यामध्ये मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच १७६ लोकांची हिमोग्लोबिन चाचणी, १२० जणांच्या हाडाचा ठिसूळपणा तपासण्यात आला. 49 जणांनी रक्तदान केले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल, जैन मंदिराचे विश्वस्त अनिल मेहता, भवरमल संघवी, दिनेश वाडेकर, विलास काळोखे, दिलीप पारेख, भगवान शिंदे, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे यांनी भेट दिली.
मायमर मेडिकल कॉलेजच्या पथकाने राहुल पारगे यांच्या नेतृत्वात नियोजन केले. रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे नियोजन राकेश ओसवाल, विनोद राठोड, राजेंद्र शहा, इंदर सोलंकी, समीर परमार, भरत राठोड, संजय सोलंकी, नीलेश जैन, घनश्याम राठोड, संजय ओसवाल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT