तळेगाव दाभाडे, ता. २३ : नगर परिषद हद्दीतील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक हा डीपी रस्ता १८ मीटरऐवजी १२ मीटर करावा. या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, माजी नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला आहे. हा रस्ता १८ मीटर रुंद केल्यास लगतची तब्बल ६९ कुटुंबे बेघर होण्याची भीती आहे. ही कुटुंबे बाधित होऊ नयेत, म्हणून सध्याच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याऐवजी ती १२ मीटर करून रस्ता करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मारुती मंदिर चौकातील नगर परिषदेच्या मुख्य इमारतीपासून संभाजीनगर मार्गे साईनाथ कॉलनी ते डाळआळी गणपती मंदिरापर्यंत १८ मीटर रस्ता रुंदीकरणाचे नियोजन करून नगरपरिषदेने या रस्त्यालगत असलेल्या ६९ घरांना नोटीस दिल्या होत्या.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या नोटीस आल्यानंतर हे नागरिक हवालदिल झाले होते. त्या सर्वांनी माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व अरूण माने यांच्याकडे धाव घेऊन ही कारवाई थांबवावी, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.