तळेगाव दाभाडे, ता. ११ : येथील राव कॉलनीतील उद्यानात वानर आणि कावळ्यांमध्ये संघर्ष सुरू होता. त्याची झळ बगळ्यांच्या निष्पाप पिलांना बसली. यात या चिमुकल्या जीवांचा मृत्यू झाला. तर, काही जखमी झाली.
येथील उद्यानात बुधवारी (ता.११) सकाळी झाडावर एक वानर आले. त्यावेळी कावळ्यांनी कावकाव करत त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. चोचीने टोचून, आवाज करत, सतत पाठलाग करत कावळ्यांनी वानराला जेरीस आणले.
या त्रासाने संतप्त झालेल्या वानराने बगळ्यांच्या घरट्यांकडे मोर्चा वळवला. एकामागोमाग एक घरटी तोडत, त्यातील पिल्लांना उचलून भिरकावत त्याने राग व्यक्त केला. कोवळ्या पंखांनी उडू न शकणारी ती पिल्लं जमिनीवर आदळली. यात काहींचा जागीच मृत्यू झाला, तर काही जखमी अवस्थेत आढळली.
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक, मावळ या संस्थेचे नीलेश गराडे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वानराला शांत करण्याचा प्रयत्न करताना घरट्यांतून वाचलेल्या पिलांचीदेखील काळजी घेतली.
गराडे म्हणाले, ‘‘कावळे, वानर आणि बगळ्यांचा हा नैसर्गिक संघर्ष प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण, यामागे मानवनिर्मित कारणांचा वाटा नाकारता येत नाही. झपाट्याने वाढणारे शहरीकरण, झाडांची कमी संख्या आणि हरवलेला अधिवास हे अशा घटनांचं मूळ आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.