पिंपरी-चिंचवड

कुंडमळा दुर्घटनेतील २४ जखमींना घरी सोडले तळेगाव, सोमाटणेत ४१ जणांवर उपचार

CD

तळेगाव दाभाडे, ता. १६ ः इंदायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी साकव कोसळल्याची दुर्घटना रविवारी घडली होती. त्यातील जखमींवर तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत ४१ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २४ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले.
तळेगाव येथील मायमर रुग्णालयात २० जणांवर उपचार सुरू होते. त्यातील १८ जणांना घरी सोडले. दोघांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयात १७ जण दाखल होते. त्यातील सात जण अतिदक्षता विभागात तर चौघे सामान्य कक्षात उपचार घेत आहेत. सहा जणांना घरी सोडले आहे. सोमाटणे येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोन आणि जनरल वॉर्डात दोन अशा चार जणांवर उपचार सुरू आहेत.
‘‘कुंडमळा दुर्घटनेतील जखमीपैकी सात जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चार जण जनरल वॉर्डात आहेत. सर्व जखमींची प्रकृती चांगली आहे. जखमीपैकी सहा जणांना घरी सोडले आहे. 
- डॉ. अजित माने, तळेगाव दाभाडे

‘‘मायमर रुग्णालयात २० जखमी दाखल होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने १८ जणांना घरी सोडले आहे. दोन जण अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
- डॉ. नितीन गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, मायमर रुग्णालय, तळेगाव दाभाडे
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambanli Ghat: आंबेनळी घाटात अपघातांना ब्रेक! अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंतींसह आधुनिक सुरक्षायंत्रणा उभारण्यास सुरुवात, बांधकाममंत्र्यांची माहीती

IPO: अवघ्या 2 दिवसांत 44 पट सबस्क्राइब! ज्वेलरी कंपनीच्या IPO ची बाजारात धूम; GMP तब्बल 36%; मोठ्या कमाईची संधी?

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Water Scarcity : पुरंदर-बारामतीची चिंता वाढली; ‘नाझरे’ची भिस्त मृत साठ्यावर

SCROLL FOR NEXT