पिंपरी-चिंचवड

मावळात लाच ‘देण्या-घेण्या’चे दरपत्रक

CD

विजय सुराणा : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. १८ : मावळ तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. निसर्गरम्य वातावरण, वाढलेले जमिनीचे दर, प्लॉटिंग आणि गृहनिर्माण प्रकल्प यामुळे हा भाग गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मात्र, याच गतीने प्रशासनात लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. सामान्य नागरिकांना दर टप्प्यावर आर्थिक लूट सहन करावी लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी एका मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याने अनेक लागेबांधे समोर आले आहेत. तर, काही ठिकाणी लाचखोरीचे ‘रेटकार्ड’ असल्याची चर्चा आहे.

महसूल, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक, वीज, पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायती व इतर शासकीय खात्यापर्यंत भ्रष्टाचाराचे जाळे पसरलेले आहे. यापूर्वीही अनेकांना लाच घेताना पकडले आहे. तर, एखाद्या कारवाईनंतर आठवडाभर सावधगिरीने काम करतात नंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते आहे. गृहनिर्माण परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, सात-बारा उतारा, सीमांकन, वीजजोडणी, फेरफार, वारसनोंदणी, प्लॅन मंजुरी यांसारख्या कामांसाठी हजारो ते लाखो रुपयांपर्यंत लाच मागितली जात आहे. मावळात लाचेला आता स्थिर दरही निश्चित झाले आहेत. विविध खात्यांमध्ये लाचेचे दर विभागानुसारच नव्हे, तर कामाच्या स्वरुपानुसार आणि संबंधित जमिनीच्या मूल्यांनुसार वेगवेगळे आहेत.

तीच खुर्ची, तशीच कारवाई
दोन दिवसांपूर्वी एका मंडळ अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे, त्याच खुर्चीवर बसलेला मागील अधिकारीही यापूर्वी लाच प्रकरणात पकडला गेला होता. ही घटना म्हणजे मावळातील लाचखोरी किती खोलवर रुतली आहे, याचे ज्वलंत उदाहरण ठरते.

दोन हजार ते २० हजार रुपये
मावळातील १०३ ग्रामपंचायतींपैकी अनेक ठिकाणी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व लिपिक यांनी लाचेचे दर ठरवले आहेत. एखाद्या फाइलसाठी दोन हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जाते. स्थानिक नागरिकांना काहीशी सूट दिली जाते, पण बाहेरील व्यावसायिकांकडून मोठ्या रकमा उकळल्या जातात.

खासगी मदतनीसांचा प्रभाव
काही कार्यालयांत खाजगी मदतनीस, एजंटच कार्यालय चालवत असल्यासारखी स्थिती आहे. हे एजंट ठराविक रक्कम घेऊन कामे करून देतात. अधिकारी त्यांच्या फाइलना प्राधान्य देतात. तर, सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रलंबितच राहतात. एखादी फेरफार नोंदणी किंवा वारसनोंदही अनेक महिले रखडते.

नागरिकांनो, संपर्क साधा
मावळ तालुक्यातील नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितली, तर त्यांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे (फोन : ०२०-२६१२२१३४) वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचचे सहायक आयुक्त दयानंद गावडे यांनी केले आहे.

दोन वर्षांत १८ जण रंगेहाथ
मावळ तालुक्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल १८ लोकसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यामध्ये तलाठी- पाच, ग्रामसेवक-तीन, पंचायत समिती अधिकारी-एक, मंडल अधिकारी-दोन, दुय्यम निबंधक- एक, मुख्याधिकारी-एक, पोलिस-तीन, वनपाल-एक, महावितरण अधिकारी-एक असे लोकसेवक गेल्या दोन वर्षांत लाच घेताना पकडण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 30 सेंमीने उघडले गेले आहेत

SCROLL FOR NEXT