पिंपरी-चिंचवड

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CD

तळेगाव दाभाडे, ता. २२ : नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ‘समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षे’चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता चौथी, सातवी, नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे : इयत्ता चौथी : शिवांश जगदाळे (पैसाफंड प्राथमिक शाळा); इयत्ता सातवी : निशांत शिर्के (श्री एकवीरा विद्या मंदिर); इयत्ता नववी : शुभम कामनवर (प्रगती विद्या मंदिर); इयत्ता अकरावी : अक्षय तुपे (पवना ज्युनिअर कॉलेज) प्रत्येक इयत्तेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर करण्यात आले असून शाळानिहाय प्रथम क्रमांकही घोषित करण्यात आले आहेत. ही परीक्षा राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या धर्तीवर तसेच एमपीएससी आणि यूपीएससीच्या स्वरूपात घेण्यात आली. विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धात्मक परीक्षांची ओळख व्हावी आणि भविष्यात प्रशासन सेवेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
संस्थेचे आधारस्तंभ कै. कृष्णराव भेगडे यांच्या प्रेरणेने आणि संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून ही परीक्षा सातत्याने घेतली जात आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, विनायक अभ्यंकर तसेच गणेश खांडगे, रामदास काकडे, चंद्रकांत शेटे आणि यादवेंद्र खळदे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन केले. परीक्षा यशस्वितेसाठी दामोदर शिंदे, महेशभाई शहा, प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे तसेच मुख्याध्यापिका वासंती काळोखे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, महादेव ढाकणे, भाऊसाहेब आगळमे, शहाजी लाखे, संजय वंजारे आणि मुख्याध्यापिका अनिता लादे यांनी विशेष परिश्रम घेतले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT