पिंपरी-चिंचवड

तळेगावात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

CD

तळेगाव दाभाडे, ता. २३ : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व आमदार सुनील शेळके फाउंडेशन यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवारी, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे-पाटील प्राथमिक शाळा येथे पार पडणार आहे.
गरजू कुटुंबांतील वधू-वरांना सन्मानाने विवाहबद्ध होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहभागी होणाऱ्या जोडप्यांची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे.
विवाह सोहळ्यानंतर सर्वांना सुरळीत व समाधानकारक भोजन मिळावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याशिवाय, वधू-वरांना संसारोपयोगी भांड्यांचा संच, गॅस सिलिंडर व रेशनिंगसह आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. विवाह प्रमाणपत्राची सोय करण्यात आली असून, काही वधूंना प्रोत्साहनपर मोबाईल फोनही देण्यात येणार आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इच्छुकांनी १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नारायणराव काळोखे नागरी पतसंस्था, समर्थ चौक, तळेगाव दाभाडे स्टेशन परिसर येथे संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

World Brain Tumor Day 2026: ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सौम्य आणि घातक गाठींमधील महत्त्वाचा फरक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बिहारमधील कोचिंग सेंटरमधील गोळीबार प्रकरणात जामीन अर्जावर आज सुनावणी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

SCROLL FOR NEXT