पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांना सीपीआर, सर्पदंश व प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

CD

तळेगाव दाभाडे, ता. ७ : इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सीपीआर (हृदयक्रिया पुनर्जीवन), सर्पदंश जनजागृती आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतील प्रथमोपचार या विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
दरम्यान, प्रमुख मार्गदर्शक सर्जेश पाटील यांनी हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने सीपीआर कसा द्यावा, सर्पदंश झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी आणि विविध वैद्यकीय आपत्कालीनप्रसंगी योग्य प्रथमोपचार कसे करावेत, याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अर्चना देशमुख, सचिव निशा पवार, प्रकल्प अध्यक्षा संगीता वानखेडे, प्रवीण साठे, वर्षा कुलकर्णी, साधना भेगडे, अमिता ओबेरियन, वृंदा भेगडे, रेणुका जाधव, चांदणी गांधी, साधना काळोखे तसेच वन्यजीव संस्था मावळचे अध्यक्ष नीलेश गराडे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका वर्षा थोरात, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतात? पंकज विष्णू यांनी सांगितला आकडा

Crime News: जिच्यावर प्रेम केलं तिच्यावरच संशय, दुसऱ्या तरुणासोबत पाहताच रागातून रॉडने हल्ला; हिंजवडीत रक्तरंजित थरार

Marathi News Live Updates : कुणबी दाखले पारदर्शकतेने देण्याचे काम सुरु- राधाकृष्ण विखे पाटील

SCROLL FOR NEXT