पिंपरी-चिंचवड

तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांचे आकृतिबंधावरून आंदोलन सुरू

CD

तळेगाव दाभाडे, ता. २४ : शासनाच्या कृषी विभागाचा १७ वर्षांनंतर जाहीर झालेला नवा आकृतिबंध क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असल्याचा आरोप करत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदनाम आणि वेतनश्रेणीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघ व सर्व तांत्रिक संघटनांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. पहिल्या टप्प्यात २४ व २५ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून निषेध केला जात आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, आस्थापना शाखेतील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक आदी पदांमध्ये बदल करून नवीन पदांची निर्मिती व वेतनश्रेणीत वाढ करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष काम करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पदांना व वेतनश्रेणीला न्याय देण्यात आलेला नाही.
पुढील टप्प्यात २७ ऑगस्ट रोजी व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणे, २८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत काम करणे, ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी लेखणी बंद आंदोलन करून अहवाल सादरीकरण व बैठकांवर बहिष्कार टाकण्यात येईल. २ व ३ सप्टेंबर रोजी सामूहिक रजा घेऊन जिल्हा व आयुक्तालय स्तरावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
दरम्यान, चार सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कृषी सेवा महासंघ व तांत्रिक संघटनांनी दिला आहे. कृषीमंत्री व कृषी आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT