IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

Dhruv Jurel on Tattoo & Rishabh Pant Injury Updates: श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत भारतासाठी ध्रुव जुरेलने शतक केल्यानंतर टॅटू दाखवत सेलिब्रेशन केले. याबाबत दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर त्याने खुलासा केला आहे. तसेच रिषभ पंतच्या दुखापतीबाबतही महत्वाची माहिती त्याने दिली.
Dhruv Jurel | Sri Lanka vs India 2nd Test

Dhruv Jurel | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 2nd Test, Marathi News: कोलंबोमध्ये श्रीलंका विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. भारतीय संघाकडून पहिल्या दिवशी देवदत्त पडिक्कलने ११७ धावांची शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) नाबाद शतक केले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा जुरेलने शतक केले, त्यानंतर त्याने दाखवलेल्या टॅटूची मात्र बरीच चर्चा झाली आहे. आता त्याने त्याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय रिषभ पंत यष्टीरक्षणासाठी का उतरला नाही, याचेही कारण सांगितले आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी पहिला डाव १३८ षटकात ९ बाद ५०३ धावांवर घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेला पहिल्या डावात दुसऱ्या दिवस अखेर ३ षटकात २ बाद ८ धावाच करता आल्याने भारताकडे ४९५ धावांची आघाडी आहे.

Dhruv Jurel | Sri Lanka vs India 2nd Test
Yashasvi Jaiswal : 'जर कोणी हद्द पार करत असेल, तर...', हर्षा भोगलेंच्या व्हिडिओवर जैस्वालची तिखट कमेंट; नेमकं काय घडलंय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com