पिंपरी-चिंचवड

तळेगावात निनादला जय श्रीरामचा जयघोष

CD

तळेगाव स्टेशन, ता. ३१ : श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने गुरुवारी (ता. ३०) रामनवमीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील श्रीराम मंदिरात सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज आणि राम भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. यानिमित्ताने तळेगावात जय श्रीराम नावाचा जयघोष निनादला.
दाभाडे आळीत असलेल्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरात सकाळी श्रध्दा संग्राम दाभाडे दांपत्याच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर जगताप महाराज यांचे कीर्तन झाले. दत्तात्रेय दाभाडे परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सरसेनापती दाभाडे घराण्याच्या वंशज माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे, मावळचे आमदार सुनील शेळके, सारिका शेळके, माजी नगराध्यक्ष अँड. रवींद्रनाथ दाभाडे, संतोष दाभाडे पाटील आदी मान्यवरांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी पाळणा झुलवत श्रीराम आरतीसह राम जन्माचे पाळणागीत गायले.
भजनीमंडळ, दिंडी, बँडपथक, ढोललेझीम, मल्लखांबाची प्रात्यक्षिकासह वाद्यांच्या गजरात सायंकाळनंतर मंदिरापासून श्रीरामाची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. प्रदक्षिणा मार्गावर राम भक्तांनी रांगोळी काढून, पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले. राम, सीता, लक्ष्मण यांची वेशभूषा केलेली पात्रे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली.
अशोक दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तुषार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय दाभाडे, रूपेश गायकवाड, प्रशांत दाभाडे गौरव तापकीर, स्वप्नील दाभाडे आणि सहका-यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

फोटोः 04094

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT