पिंपरी-चिंचवड

मावळ माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात

CD

तळेगाव स्टेशन, ता. ३१ : महेश नवमी उत्सवानिमित्त रविवारी (ता. २८) मावळ माहेश्वरी समाज संस्थेच्यावतीने तळेगाव दाभाडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड रक्तपेढीचे संचालक युवराज बडगुजर यांच्या सहकार्यातून भंडारी हॉस्पिटल येथे आयोजित शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले.
आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीतून भगवान महेश यांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. पुष्पावती बवले सभागृहात झालेल्या मुख्य कार्यक्रमात गणेश वंदना, महेश वंदना आणि स्वागत गीतानंतर प्रमुख पाहुणे महेश बँकेचे अध्यक्ष जुगल पुंगलिया, डॉ. दीपाली झंवर, डॉ. संजय मानधने, पांडूलाल सोनी, अजय लड्ढा यांचा मावळ माहेश्वरी समाज संस्थेचे अध्यक्ष उमेश भुतडा आणि सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते डॉ. शाळिग्राम भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भजन, आरती आणि सुग्रास महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. महेश नवमी समारंभास मावळ तालुक्यातील माहेश्वरी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. ज्ञानेश्वर मंत्री यांनी प्रास्ताविक केले. सुषमा जाजू यांनी सूत्रसंचालन केले. राधेश्याम भंडारी, चंद्रशेखर जाजू, अभिजित दागडिया, राजगोपाल मुंदडा, प्रवीण भुतडा, अमित सारडा, पूजा सिंगी, संध्या भट्टड, विकास काबरा, संदीप भुतडा, सूरज भराडिया, सुरेश भराडिया आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.

फोटो ओळी :
तळेगाव दाभाडे : मावळ माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या पालखीतील भगवान महेशाची मूर्ती.
फोटो ः 04291

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT