तळेगाव स्टेशन, ता. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ६) दिवसभर तळेगाव दाभाडे येथील स्मारकासह विविध ठिकाणी अभिवादन आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने धम्मदिप बुध्द विहार ते डॉ. आंबेडकर स्मारकापर्यत कँडल मार्च काढून अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता. ६) दिवसभर मावळ तालुक्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड परीसरातील भीम अनुयायांची रीघ लागली होती. गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून आयोजित ‘एक वही, एक पेन’ उपक्रमास प्रतिसाद देत अनुयायांनी वही व पेन समितीकडे जमा केले.
समितीचे सचीव किसन थूल, संचालक संतोष मेश्राम, देवानंद बनसोडे, दिनेश गवई, रावसाहेब कांबळे, अमित भोसले आदींनी नियोजन केले.
यशवंतनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्रपाली महिला मंडळ व लोकआधार फाउंडेशनच्या वतीने सकाळी व संध्याकाळ अशा दोन सत्रांत डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भीमवंदना करण्यात आली. माजी नगरसेवक निखिल भगत, स्वानंद आगाशे, बाळासाहेब गायकवाड, प्रमोद देशक, सुरेश झेंड, ॲड. मयूर लोढा, सुनील आगळे, बाळू कांबळे, करण शेळके आदींसह परिसरातील भीम अनुयायांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल गजरमल, वसंत इंगळे गुरुजी यांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. लोकआधार फाउंडेशनचे संस्थापक सुशांत ननावरे यांच्यासह आम्रपाली महिला मंडळाच्या सदस्या धन्वंतरी ननवरे, नीता ओव्हाळ, इंदूबाई गायकवाड, मंदा गायकवाड, लीलाबाई ननवरे, संगीता वाघमारे, संगीता साळवे, सुदामती जाधव व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.