तळेगाव स्टेशन, ता. ७ : ‘‘शिक्षणासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे कार्य अद्वितीय आणि आदर्शवत राहिले आहे. पदरमोड करुन उभ्या केलेल्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इंद्रायणी महाविद्यालयासारख्या संस्थांद्वारे त्यांचे काम मार्गदर्शक आहे,’’ अशा भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केल्या.
मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कांतिलाल शाह विद्यालय येथे आयोजित शोकसभेत भेगडे यांच्या कार्य आणि आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी शहरासह मावळातील नागरिक, पदाधिकारी, यांच्यासह संस्थेची महाविद्यालये आणि शाळांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकांसह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
‘‘परराज्यात जाणारे उद्योग महाराष्ट्रात थांबवण्यासाठी उद्योगांना जागा राखीव ठेवाव्यात, धरणे बांधून पाणीपुरवठ्याची सोय व्हावी, पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक रस्ता व्हावा यासाठी कृष्णराव भेगडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना निवेदनांतून मागणी केली होती,’’ अशाही आठवणी काकडे यांनी उलगडल्या.
शिक्षिका सुलोचना इंगळे, मुख्याध्यापक रवींद्र शेळके, प्राचार्य संजय आरोटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, प्रा. उत्तम खाडप, यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, विलास भेगडे, हरिश्चंद्र गडसिंग, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आदींनी यावेळी भावना व्यक्त करत कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शेटे म्हणाले, ‘‘लहानपणी आळीमध्ये राहताना कृष्णराव भेगडे यांचा सहवास लाभला. नागरिकांचे वर्तन कसे असावे याबाबतचा आदर्श वास्तूपाठ घालून देत त्यांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते उभे केले. संस्थेच्या सर्व विभागांमध्ये कृष्णराव भेगडे यांचे तैलचित्र लावसवेत. यामुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल’’
प्रा. राजाराम डोके आणि प्रा. विजय खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.