पिंपरी-चिंचवड

तळेगावात गणरायाच्या आगमनाची उत्साहपूर्ण तयारी

CD

तळेगाव स्टेशन, ता. २५ : तळेगाव दाभाडे परिसरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे उल्हासपूर्ण आणि आनंदमय वातावरण असून, विद्युत रोषणाई, सजावट आणि पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे.
जवळपास दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेले ढोल-ताशा पथकांचे सराव, महिनाभरापासून थाटलेले गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल आणि इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळांच्या आयोजनाने तळेगावात गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली. लागोपाठ आठवडाभरापासून सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप आणि सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल रस्त्याकडेला सजण्यास सुरवात झाली. बाजारपेठेतील सजावटीच्या वस्तू आणि विद्युत साहित्याची दुकानेही झगमगली आहेत. बुधवारी (ता. २७) भाद्रपद चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होत आहे. घराघरांत गणरायाच्या स्वागताच्या तयारीला वेग आला आहे. घरगुती गणपती स्थापनेसाठी घराची स्वच्छता, गणपती विराजमान करण्यासाठी मखरे आणि सजावट करण्यासाठी गृहिणींसह लहानग्यांचीही लगबग दिसत आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप, विद्युत रोषणाई, गुलाल, रांगोळी, तोरणे, मखरे, पूजा साहित्यासह ढोल-ताशांची जुळवाजुळव सुरू आहे. मारुती मंदिर चौकात, स्टेशन रस्त्यावर, चाकण रस्त्यालगत शर्मा कॉम्प्लेक्ससमोर, यशवंतगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वराळे रस्त्यालगत विक्रेत्यांनी लावलेल्या सजावटीच्या वस्तू आणि पूजा साहित्याच्या स्टॉलवर खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी दिसून येत आहे. विविध रंगीबेरंगी मोदकाच्या आकाराच्या पेढ्यांच्या थाळ्यांनी मिठाईची दुकाने भरली आहेत. सार्वजनिक मंडळांत आणि घरोघरी विराजमान असणाऱ्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी तळेगाव सज्ज झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नारळ आणि फुलांच्या किमतींमध्येही वाढ झाल्याचे दिसते. सरकारने नुकतीच केलेली प्लॅस्टिक फुलांवर बंदीची घोषणा हवेतच विरली असून, सगळीकडे सर्रास प्लॅस्टिक फुलांच्या माळा, तोरणे विक्रीस उपलब्ध आहेत. परिणामी, नैसर्गिक सुगंधी फुलांचा दरवळ प्लॅस्टिक फुलांच्या दिखाव्यात घुसमटल्याचे चित्र आहे. पारंपरिक फूल विक्रेत्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेतून गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनदृष्टीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे कृत्रिम हौद, मूर्तीदान केंद्र तसेच निर्माल्य कलश स्थापण्याचे काम प्रगतिपथावर आहे. गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी नियमावलीसह सूचना जाहीर करत तळेगाव दाभाडे पोलिस प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली आहे.

TLS25B06153

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

SCROLL FOR NEXT