तळेगाव स्टेशन, ता. २४ : स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त पैसाफंड शाळेत स्काऊट गाइडच्या तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कब-बुलबुल शिबिराचे शनिवारी (ता. २१) आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्हा साहाय्यक आयुक्त स्काऊट तथा प्रशिक्षण समुपदेशक प्रा. विजयकुमार जोरी, महेश शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सल्लागार सोनबा गोपाळे कार्य्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस अभिवादनानंतर स्काऊट ध्वजवंदनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सकाळच्या सत्रात परिसर स्वच्छता, व्यायाम, सर्वधर्मीय प्रार्थना, तात्पुरता निवास आदींसह विविध साहसी खेळांचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रथमोपचार, स्ट्रेचर, बंधने प्रशिक्षण, विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. स्काऊटचे साहाय्यक जिल्हा आयुक्त विजय जोरी यांनी विविध प्रात्यक्षिके आणि मनोरंजनात्मक खेळातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नवप्रेरणा दिली. मुख्याध्यापिका अनिता लादे, पल्लवी जगताप, सुरेखा हांडे, शीतल बोंबले, वैशाली मानकर, मनिषा निऱ्हाळी, विठ्ठल दरेकर, गणेश साबळे, लक्ष्मण बोंबले यांच्यासह सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराचे नियोजन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.