पिंपरी-चिंचवड

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ते कामाला गती

CD

तळेगाव स्टेशन, ता. २८ : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-५४८ डी हा रस्ता विकसित करण्याच्या कामाचा अंतिम अध्यादेश सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत ‘रचना करा, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (डीबीओटी) तत्वावर हे काम होणार आहे.
तळेगाव-चाकण- शिक्रापूर हा ५३ किलोमीटरचा महामार्ग मुंबई-पुणे आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होते. हे टाळण्यासाठी तळेगाव ते चाकण मार्गावर चार पदरी उन्नत महामार्ग आणि जमिनीस समांतर चारपदरी रस्ता विकसित करणे, तसेच चाकण ते शिक्रापूर मार्गात जमिनीस समांतर चार पदरी रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत विकसित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर मंगळवारी (ता.२४) मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. कामाची प्रस्तावित किंमत चार हजार ९०२ कोटी रुपये आहे. या कामासाठी मॉन्टेकार्लो लिमिटेड या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.

असा असेल प्रकल्प
- तळेगाव ते चाकण २८.३ किलोमीटर अंतरात चौपदरी उन्नत (एलिव्हेटेड) बांधणी
- तळेगाव ते शिक्रापूर ५३.२ किलोमीटरमध्ये जमिनीस समांतर चारपदरी रस्ता
- १७१ लहान जंक्शन, तर चार मोठे जंक्शन
- डाव्या उजव्या बाजूने चढ-उतार करण्यासाठी चार रॅम्प
- या रस्त्यावर जमिनीवर दोन आणि उड्डाणपुलावर पाच असे सात पथकर वसुली नाके (टोल प्लाझा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT