पिंपरी-चिंचवड

रांगोळीतून प्रथमच भारतीय - कोरियन संस्कृतीचा मिलाफ

CD

तळेगाव स्टेशन, ता.७ : दक्षिण कोरियातील २२ व्या अन्सान आंतरराष्ट्रीय पथ कला महोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच तळेगावातील युवा कलाकार भाग्यश्री देशपांडे हिने साकारलेल्या रांगोळीच्या माध्यमातून कोरियन संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. मराठमोळ्या भाग्यश्रीने रेखाटलेल्या रांगोळीने कोरियन यजमान देखील भारावून गेले.
वाढत्या औद्योगिक भागीदारीसोबतच भारत आणि दक्षिण कोरियामध्ये आता सांस्कृतिक देवाणघेवाण देखील दृढ होताना दिसत आहे. अन्सान पथ कला महोत्सव हा दक्षिण कोरियातील अन्सान शहरात दरवर्षी मे महिन्यात आयोजित केला जाणारा एक वार्षिक पथ उत्सव आहे. रस्त्यांवरील जागांचे कलेच्या दालनांमध्ये रूपांतर करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. स्थानिक कोरियन कलाकारांसह परदेशी कलाकारही या महोत्सवात आपली कला सादर करतात. ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात. भाग्यश्रीच्या रांगोळी कलाकृतींची सोशल मीडियावरील झलक पाहून यंदा अन्सान आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीकडून त्यांना खास निमंत्रित करण्यात आले. या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय कला महोत्सवामध्ये जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि भारतासह विविध देशांतील कलाकारांनी आपल्या अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले.

महोत्सवाचे खास आकर्षण
दक्षिण कोरियात पहिल्यांदाच भारतीय रांगोळी साकारली गेली. तब्बल ४ तासांचे अथक परिश्रम घेत भाग्यश्री देशपांडे आणि सहकलाकार महेंद्र मेटकरी या दोघांनी कोरियातील रस्त्यांवर साकारलेल्या भव्य रांगोळी महोत्सवाचे खास आकर्षण ठरली. भारतीय रांगोळी कलेतील व्हायब्रंट रंग, नाजूक कलाकुसर आणि त्यामागील सांस्कृतिक परंपरा दक्षिण कोरियातील लोकांना विशेष भावली. पारंपरिक भारतीय ढंगाच्या रचनेमध्ये साकारलेल्या कोरिअन थीमच्या रांगोळ्यामुळे भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात अधिक आदर आणि आकर्षण निर्माण झाल्याचे यानिमित्ताने जाणवल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

रांगोळ्या, त्यातील रंगांची उधळण आणि भारतीय संस्कृतीचे सौंदर्य दक्षिण कोरियातील नागरिकांसमोर मांडण्याची संधी अन्सान आंतरराष्ट्रीय महोत्सवाद्वारे मिळाली. अशा अनोख्या आणि भव्य महोत्सवात भारतीय रांगोळी कला साकारताना कोरियन प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हास्य, उत्सुकता आणि आनंद पाहून मन अभिमानाने भरून आले.
- भाग्यश्री देशपांडे, रांगोळी कलाकार, तळेगाव दाभाडे
TLS26B06838

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambanli Ghat: आंबेनळी घाटात अपघातांना ब्रेक! अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंतींसह आधुनिक सुरक्षायंत्रणा उभारण्यास सुरुवात, बांधकाममंत्र्यांची माहीती

IPO: अवघ्या 2 दिवसांत 44 पट सबस्क्राइब! ज्वेलरी कंपनीच्या IPO ची बाजारात धूम; GMP तब्बल 36%; मोठ्या कमाईची संधी?

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Water Scarcity : पुरंदर-बारामतीची चिंता वाढली; ‘नाझरे’ची भिस्त मृत साठ्यावर

SCROLL FOR NEXT