पिंपरी-चिंचवड

वडगावात रंगला अवखळ बैलांचा खेळ

CD

वडगाव मावळ, ता. ३ : वाजंत्रीचा गलबलाट, फटाक्यांची आतषबाजी व भंडाऱ्याची उधळण करत बैलांच्या मिरवणुका काढून अतिशय उत्साह व आनंदाच्या वातावरणात बैलपोळ्याचा सण साजरा झाला. चावडी चौकात अवखळ बैलांच्या शिंगांना बांधलेला नारळ तोडण्याचा पारंपरिक खेळ रंगला. तो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा वर्षातून एकदा येणारा सण साजरा करण्यासाठी बळीराजाची सकाळ पासूनच लगबग सुरू होती. बैलांना ओढ्या-नाल्यावर अंघोळ घालून त्यांना विविध रंगांनी रंगवण्यात आले होते. सजावटीच्या विविध साहित्याचा वापर करून सजवले होते. दुपारी पुरणपोळीचा नैवैद्यही खाऊ घालण्यात आला. येथील ढोरे, म्हाळसकर, चव्हाण, भिलारे, पगडे, वहिले, वायकर, कुडे, दंडेल, तूमकर, जाधव, पडवळ आदी शेतकरी कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून गोठ्यात पूजा केली. काही कुटुंबांनी बैलांना देवदर्शनासाठी आणले होते. काही बैलगाडा मालक व शौकिनांनी वाजंत्री व डीजे लावून मिरवणुका काढल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. येथील चावडी चौकात अवखळ बैलांच्या शिंगांना बांधलेला नारळ तोडण्याचा पारंपरिक खेळ रंगला. देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, चंद्रकांत ढोरे, सचिव अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव सोसायटी अध्यक्ष किसनराव वहिले, शांताराम कुडे, महेंद्र म्हाळसकर, वस्ताद उमेश ढोरे, पंढरीनाथ भिलारे, पुजारी मधुकर गुरव आदींच्या हस्ते बैलांची पूजा करून पारंपरिक खेळाला सुरुवात झाली. भिलारे, चव्हाण, पगडे आदी कुटुंबांनी बैलांच्या शिंगांना नारळ बांधले होते. त्यांनी ताकास तूर लागू न देता नारळ तोडू दिला नाही व नागरिकांची वाहवा मिळवली. हा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

बळीराजाचा सन्मान
बैल पोळ्यानिमित्त येथील जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टच्या वतीने बुधवारी शेतकरी कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पोटोबा देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त स्व.सोपानराव म्हाळसकर तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक राजू जवळेकर यांच्या गुणवंत मन्या बैलाला यावेळी आदरांजली वाहण्यात आली. तालीम मंडळाचे सचिव उमेश ढोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयोजन केले. देवस्थानचे विश्वस्त अनंता कुडे यांनी सूत्रसंचालन केले.

वडगाव मावळ : बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेली बैलांची मिरवणूक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT