वडगाव मावळ, ता. १२ ः येथील शिवजयंती उत्सव समितीने १४ ते १७ मार्च दरम्यान राजे शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विविध स्पर्धा, पुरस्कार वितरण सोहळा, छावा चित्रपटाचे प्रदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, अध्यक्ष अतिश ढोरे, मावळते अध्यक्ष अनंता कुडे, कार्याध्यक्ष प्रशांत भिलारे, कार्यक्रम प्रमुख संतोष चव्हाण, उपाध्यक्ष रोहित गिरमे, दर्शन वहिले, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, अरुण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी (ता.१४) सकाळी शिवप्रतिमेचे पूजन व दगडी गोटी उचलणे हा शिवकालीन मर्दानी खेळ होईल. शनिवारी ( ता.१५ ) महिलांसाठी या ‘गं सयांनो खेळ खेळूया पैठणीचा’ हा कार्यक्रम होईल. रविवारी (ता.१६) मुलामुलींसाठी विविध स्पर्धा व सायंकाळी खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे असतील. सुषमा भागवत (इंदोरी) यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, मनोहरपंत ढमाले (बेबडओहोळ) यांना सांप्रदायिक भूषण पुरस्कार, वडगावचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना कर्तव्यदक्ष पुरस्कार, उद्योजक अतुल वायकर यांना युवा उद्योगरत्न पुरस्कार व वेटलिफ्टर शुभम तोडकर याला खेल रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सिने अभिनेते रमेश परदेशी व श्रीकांत यादव यांची उपस्थिती असेल. शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडा व महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होईल. सोमवारी ( ता.१७ ) सहजयोग ध्यान केंद्राच्या सहभागाने शिवजन्मोत्सव साजरा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.