पिंपरी-चिंचवड

अपघातामुळे वडगावात महामार्गावर वाहतूक कोंडी

CD

वडगाव मावळ, ता. २७ : पुणे-मुंबई महामार्गावर येथील मातोश्री हॉस्पिटलजवळ गुरुवारी सकाळी पीएमपीएल बस, मोटार व डंपरच्या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.
येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात महामार्गावरच बसचा थांबा आहे. गुरुवारी सकाळी निगडीवरून लोणावळा बाजूकडे जाणारी पीएमपीएलची बस (एमएच १४ एचयू ६२९३) प्रवासी उतरविण्यासाठी तेथे थांबली होती. त्यावेळी मागून आलेली मोटार (एमएच १२ एसइ ९८२४) बस थांबलेली पाहून बाजूने जाण्याच्या प्रयत्नात असताना मागून खडीने भरलेला डंपर (एम एच १४ एच जी ६६७७) आला. मोटारीला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक मारल्याने तो दुभाजकात घुसला व खडीने भरलेली मागील ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली. या विचित्र अपघातात डंपर चालक जखमी झाला असून, वाहनांचे विशेषतः: मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वडगाव पोलिसांनी क्रेन मागवून अपघातग्रस्त डंपर व रस्त्यावर पडलेली खडी बाजूला केल्यानंतर सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’
येथील मातोश्री हॉस्पिटल चौक हा अपघातांचा ब्लॅक स्पॉट असून, येथे वारंवार अपघात होत आहेत. वर्षभरापूर्वी येथील बस थांब्यामध्ये कंटेनर घुसून एक महिला मृत्यूमुखी पडली होती. पीएमपीएल बस, कंपनीच्या बस तसेच स्कूल बस महामार्गावरच थांबत असल्यानेमु अनेकदा अपघात झाले आहेत. गेल्या आठवड्यात हॉटेल शिवराज चौकात महामार्ग ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला टेम्पोने धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. महामार्गाची देखभाल करणारी आयआरबी कंपनीच्या वतीने अपघात झाल्यानंतर उपायांची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु येथे असणाऱ्या विविध ‘ब्लॅक स्पॉट’वर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT