पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

CD

वडगाव मावळ, ता. ३ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेकडे केली आहे.
राज्य ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेला देण्यात आलेल्या निवेदनात विविध प्रश्न व मागण्या करण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांचे वजन काटे कॅलिब्रेशन करण्यासाठी अवाजवी फी घेऊ नये. शासनाची पडताळणी फी चारशे रुपये असताना बाराशे रुपयांची मागणी केली जाते अशी स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार आहे. मावळ तालुक्यातील आठवडे बाजार, लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव दाभाडे, देहूरोड येथील वजन मापे कॅलिब्रेशन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय सुरू करावे. वडगाव शहरामध्ये भूमीअंतर्गत टाकण्यात आलेल्या केबल व तत्सम यंत्रणेच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती अंदाजपत्रकासह दर्शनी बाजूला फलकावर लावावी. वडगाव नगरपंचायत कर प्रणाली, वडगाव शहर विकास आराखडासंदर्भात ग्राहकांनी दाखल केलेल्या अनेक हरकती प्रलंबित असून त्या मार्गी लावाव्यात. वडगाव नगरपंचायत प्रशासनाने ग्राहक दिन साजरा करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. मावळ तालुक्यातील सर्व राष्ट्रीय बँकांनी ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत. राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा मंजूर असतानादेखील अद्यापपर्यंत बसेसच्या वाहकांकडील मशिनमध्ये तिकीट देण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील बसेस या ठिकाणी थांबत नाहीत. याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी. तहसीलदार कार्यालयात साजऱ्या होणाऱ्या लोकशाही दिनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा यासाठी कार्यक्रमापूर्वी त्याची पुरेशी जनजागृती करावी. वडगाव शहरातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठ्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहराला स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून वीज पुरवठा सुरळीत करावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

Sambhajinagar Students Crisis: गॅसअभावी ‘सिपेट’ची मेस बंद; उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी धरली घरची वाट; ताटात खिचडी, जेवणात अळ्या

Beed Crime: लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीची विक्री अन् अमानवी अत्याचार, थरारक घटनेने बीड हादरले!

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

SCROLL FOR NEXT