पिंपरी-चिंचवड

वडगाव फाट्याजवळ उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरची गरज

CD

वडगाव मावळ, ता.१४ : वडगाव प्रवेशद्वाराजवळील फाट्यावर वळण घेणाऱ्या (यु टर्न) वाहनांमुळे महामार्गावर वारंवार कोंडी होऊ लागली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि आयआरबी कंपनीचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटरसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, तत्पूर्वी येथे तात्पुरत्या स्वरूपात काही उपाय योजना तातडीने करण्याची गरज आहे.

प्रमुख कारणे
- तळेगाव दाभाडे, चाकण, रांजणगाव औद्योगिक भागांतील अवजड वाहने, कामगार बस, प्रवासी वाहनांच्या संख्येत वाढ
- क्रशर, रेडी मिक्स उद्योगातील अवजड वाहनांची दिवसभरात असंख्य वेळा वडगाव, तळेगाव फाट्यावरून ये - जा
- अलीकडच्या काळात पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येतही वाढ
- द्रुतगती महामार्गावरील वाहनांना जुना महामार्ग ओलांडावा लागत असल्याने वडगाव - तळेगाव फाटा येथे कोंडी
- तळेगाव एमआयडीसी, चाकण येथील औद्योगिक क्षेत्राकडे जाणारी मालवाहू अवजड वाहने, द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने यांची संख्या मोठ्या प्रमाणावर
- बेशिस्त वाहनचालकांचीही कोंडीत भर

एकेरी मार्ग असूनही समस्या
गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव चौकातील कोंडी कमी करण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावरून चाकण, तळेगाव एमआयडीसी व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना तळेगाव फाट्यावर एकेरी मार्ग करण्यात आला आहे. या सर्व वाहनांना दीड किलोमीटर पुढे वडगाव प्रवेशद्वाराजवळील फाट्यावर येऊन वळण (यु टर्न) घ्यावे लागते. लांबलचक कंटेनरला वळायला पुरेशी जागा नसल्याने तो संपूर्ण रस्ता अडवतो व दोन्ही बाजूंची विशेषत: मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने थांबून वाहतूक कोंडी होते. मुंबई बाजूकडून येणारी वाहने उतार असल्याने भरधाव येतात. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा अपघातही झाले आहेत. वाहनांच्या मोठ्या वर्दळीमुळे चौकातील रस्ता कायम नादुरुस्त होत असतो.

कार्यवाही शून्य
वाहतूक कोंडी व अपघातांचा ब्लॅक स्पॉट बनलेल्या ठिकाणांची रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सात ते आठ वर्षांत अनेकदा पाहणी करून कायमस्वरूपी सुरक्षाविषयक उपाययोजनांचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र त्यांच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत.

उपाय योजना काय ?
- उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर तयार करणे
- चौकातील रस्त्यांचे रुंदीकरण, चौकाचा विस्तार करणे
- नादुरुस्त रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल आवश्यक
- बेशिस्त वाहनचालकांसाठी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक
- वेग मर्यादेसाठी ब्लिंकर दिवे, रम्बलर स्ट्रीप स्पीड ब्रेकर
- एमआयडीसी रस्त्याकडून उलट दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई आवश्यक
- वडगाव ते तळेगाव महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते
- चालकांना दिसतील अशा पद्धतीने चिन्ह आणि सूचना फलक लावणे

वडगाव फाट्यावरील वाहनांची प्रचंड वर्दळ लक्षात घेता येथे उड्डाणपुलासारख्या कायमस्वरुपी व्यवस्थेची गरज आहे. मात्र, ही व्यवस्था होईपर्यंत येथे तात्पुरत्या स्वरूपात काही उपाय योजना करण्यासाठी आयआरबी कंपनीला पत्र दिले आहे. चौकाचा विस्तार, नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती, वेग नियंत्रणासाठी रम्बलर स्ट्रीप आदींचा त्यात समावेश आहे.
- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, वडगाव पोलिस ठाणे


नियोजित रिंगरोडच्या कामात वडगाव येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हा पूल झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. रिंग रोडच्या कामाला द्रुतगती मार्गापासून (उर्से) सुरुवात झाली असून लवकरच या कामाला गती येईल.
- शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ


वडगाव फाट्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी ठरलेलीच आहे. त्यातच मुंबई बाजूकडून वेगाने वाहने येतात. अशावेळी जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. विद्यार्थी व ग्रामस्थांची सुरक्षा लक्षात घेऊन येथे कायमस्वरुपी उपाय करण्याची गरज आहे.
- गणेश ढमाले, स्कूलबस चालक

VDM25B10279

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT