वडगाव मावळ, ता.१७ : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेमध्ये सुरक्षतेची भावना कायम राहण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलिस दल व केंद्रीय सशस्त्र दलाच्या वतीने वडगावात रूट मार्च करण्यात आला.
तहसील ऑफीस, पंचायत समिती चौक, न्यायालय, श्री पोटोबा मंदिर, जामा मस्जिद, चावडी चौक या ठिकाणाचा परिचय होण्याच्या दृष्टीने हा रूट मार्च करण्यात आला. सण, उत्सव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच भविष्यातील करावयाच्या कारवाई संदर्भात परिचय होण्याच्या दृष्टिने परिसराची माहिती होण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स बटालियन, नवी मुंबई व वडगाव मावळ पोलिस स्टेशन असे संयुक्त रूट मार्च घेण्यात आला. यामध्ये वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे तीन अधिकारी तसेच आर. ए. एफ. चे दोन अधिकारी व ५० सशस्त्र जवान सहभागी झाले होते.