पिंपरी-चिंचवड

वडगाव मतमोजणी तयारी ( सुधारित बातमी)

CD

वडगाव मावळ, ता. १८ : येत्या रविवारी (ता. २१) होणाऱ्या वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नगरपंचायत कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होईल. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची अपेक्षा आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी ही माहिती दिली. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले होते. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती, मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार ती पुढे ढकलण्यात आली होती.
उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) नगरपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदानाप्रमाणेच मतमोजणीची प्रक्रियाही शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले.
शहरातील १७ प्रभागांसाठी २४ मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला होता. मतदार संख्या जास्त असलेल्या १, २, ७, १३, १५, १६ आणि १७ या प्रभागांमध्ये दोन मतदान यंत्रांचा वापर झाला होता. मतमोजणीसाठी सात टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. पहिल्या दोन फेऱ्यात प्रत्येकी सात, तिसऱ्या फेरीत सहा तर चौथ्या फेरीत चार मतदान यंत्रांमधील मतांची मोजणी होणार आहे. मतदानासाठी एकाच यंत्राचा वापर झालेल्या ३, ४, ५, ६, ८, ९, १०, ११, १२ आणि १४ या प्रभागांमधील मतमोजणी एकाच फेरीत पूर्ण होईल. दोन यंत्रांचा वापर झालेल्या प्रभागांमधील मतमोजणीसाठी दोन फेऱ्या होतील. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी प्रत्येकी सात, तर नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी प्रत्येकी एका मतमोजणी प्रतिनिधीला प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधीला प्रवेश असेल. निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सोबत मोबाईल आणण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT