पिंपरी-चिंचवड

गोळीबार प्रकरणात चौघांविरुद्घ कारवाई

CD

वडगाव मावळ, ता. १० : शहरातील केशवनगर भागात पाच महिन्यांपूर्वी गोळीबार झाला होता. या प्रकरणात अटकेतील चौघांविरुद्घ भारतीय न्याय संहिता कलम-१११ प्रमाणे ‘संघटित गुन्हेगारीचे’ कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती वडगावचे पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिली.
येथील एकवीरा चौकात आठ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या गुन्ह्यात आरोपी रणजित ओव्हाळ (वय २३), अभिजित ओव्हाळ (वय २४ दोघेही रा. सांगवी, ता. मावळ) प्रथम दिवे (वय २३, मूळ बदलापूर, हल्ली रा. म्हाळुंगे इंगळे) यांना अटक करण्यात आली होती. तर, गोळीबार करणारा मुख्य आरोपी सौरभ उर्फ धनू वाघमारे (वय २३, रा. कुरकुंडी ता. खेड) हा फरार होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली होती.
तत्कालीन पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी आरोपी रणजितकडून गावठी पिस्तूल जप्त केले होते. तर, दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले होते. पोलिस निरीक्षक देशमुख यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या आरोपींचा आढावा घेतला. त्यावर हा गुन्हा संघटीतरित्या टोळीचे वर्चस्व वाढवणे, तसेच पैशांसाठी केल्याचे समोर आले. त्यावर देशमुख यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कलमवाढ व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना अहवाल सादर केला होता. यावरून गिल्ल यांनी कारवाईस मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT