वडगाव मावळ, ता. २४ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व गट शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शाळांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत बसवलेल्या सीसीटीव्हींचे नियंत्रण (ॲक्सेस) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे असावे. प्रलंबित असलेली बिले अदा करावीत. शिक्षकांच्या अर्जित रजा अथवा वैद्यकीय रजा मंजुरीबाबत विलंब होऊ नये. काही शिक्षकांना या आर्थिक वर्षात कर बसलेला नाही; पण वर्षभरात ॲडव्हान्स टॅक्स कपात झालेला आहे. तो परत मिळावा. शाळा व ग्रामपंचायत यांचे ध्वजस्तंभ स्वतंत्र असावेत. गेली तीन वर्षे तालुक्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाहीत ते जाहीर करावेत, अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.
गटविकास अधिकारी प्रधान व गट शिक्षणाधिकारी रोडगे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात, राज्य संघाचे सल्लागार राजू भेगडे, सुमती निलवे, पुष्पा घोडके, राजेश राऊत, हरिश्चंद्र शिवदे, अमोल चव्हाण, तालुकाध्यक्ष मुकुंद तनपुरे, महिला अध्यक्षा मनिषा गाडे, संतोष भारती, कल्याणी गायकवाड, सचिन आंब्रुळे, नवनाथ आडकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.