पिंपरी-चिंचवड

संत तुकाराम कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

CD

वडगाव मावळ, ता. २६ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. या हंगामात कारखान्याने तीन लाख ९७३.८३० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून तीन लाख ९ हजार ६७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ११.५६% इतका आलेला आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पामधून दोन कोटी ३७ लाख ११ हजार २०० युनिट वीज निर्मिती करून एक कोटी ४२ लाख ३० हजार ३० युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला निर्यात केली आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पामधून रेक्टीफाईड स्पिरीट ४८ लाख ३६ हजार ५१४ लिटर्स व इथेनॉल ४१ लाख ५३ हजार ४१९ लिटर्स उत्पादित झाले असून, इथेनॉल उत्पादन चालू आहे. कारखान्याचा गळीत हंगाम साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व विशेषतः ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतूकदार यांच्यामुळे यशस्वी झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी दिली.
गळीत हंगाम सांगता समारंभाला कारखान्याचे संचालक धैर्यशील ढमाले, धोंडीबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रेय उभे, छबूराव कडू, विलास कातोरे, भरत लिम्हण, अतुल काळजे, शिवाजी कोळेकर, संचालिका ज्योती अरगडे, शोभाताई वाघोले, माजी तज्ज्ञ संचालक ज्ञानेश नवले तसेच प्र. सचिव मोहन काळोखे, चीफ इंजिनिअर रणजितसिंह जगदाळे, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, सुरेश सस्ते, सुदाम पवार, सुरेश वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, ऊस पुरवठा अधिकारी हिरामण गोपाळे, प्रदीप सावंत, रवींद्र शिंदे, सत्यवान पवार, देविदास उभे आदींसह सर्व कर्मचारी, ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार उपस्थित होते. यावेळी जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गळीत हंगाम २०२६-२७ साठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये एकूण तीन हजार २९१.५८ हेक्टर उसाची नोंद असून, त्यापैकी खोडवा एक हजार ६४८.७६ हेक्टर व नवीन लागवड एक हजार ६४२.८२ हेक्टर इतकी नोंद कारखान्याकडे झाली आहे. अद्याप उर्वरित नोंद घेण्याचे काम चालू आहे. हेक्टरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या शेतकी विभागाच्या वतीने व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. व ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांच्या मार्फत गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT