पिंपरी-चिंचवड

हरवलेली सोनसाखळी काही तासांत सापडली

CD

वडगाव मावळ, ता. १८ : वडगाव बाजारपेठेत गहाळ झालेली अडीच तोळ्यांची सोनसाखळी पोलिसांनी शोधून दिली.
परमेश्वर पवार (वय ३५ वर्ष, रा. पौड) हे वडगाव येथे नातेवाइकांकडे आले होते. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरात पडली. ही बाब त्यांना अर्धा तासाने लक्षात आली. त्यांनी परत येऊन पाहिले असता, सोनसाखळी सापडली नाही. तर, ही सोनसाखळी एका फळविक्रेत्या महिलेच्या हातगाडीसमोर ही साखळी पडल्याचे आणि थोड्या वेळाने एका महिनेने ती उचलून नेल्याचे एका सीसीटीव्हीत दिसले. पोलिसांनी तांत्रिक तपासात संबंधित संशयित महिलेस निष्पन्न केले व विचारपूस करून गहाळ झालेली सोनसाखळी तिच्याकडून हस्तगत करत मूळ मालक महिलेकडे सुपूर्त केली. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, अजित ननावरे, आशिष काळे, पी. सी. पेतुरे आदींनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

काही गावांमध्येच लोड शेडिंग का? 'हे' आहे मुख्य कारण; सिंगल फेजवर कृषीपंप जोडणी, आता वीज चोरी थांबली नाही तर पावसाळ्यातही गावे राहणार अंधारात, वाचा...

Human interest Story: जावयासाठीचा सोन्याचा धोंडा मांजरानेच गिळला! चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोटातून अंगठी बाहेर, अधिक मासातील अनोखी घटना

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

SCROLL FOR NEXT