पिंपरी-चिंचवड

खोदकाम करताना सापडली बॉम्बसदृश वस्तू हिंजवडीतील घटना ः एक फूट लांबी व चार किलो वजन

CD

हिंजवडी, ता. ३ : आयटी पार्क हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माण-म्हाळुंगे रस्त्यातील ब्लोरिस सोसायटीच्या मागे बुधवारी (ता. ३) पीएमआरडीए प्रशासनाकडून पूल उभारण्याच्या कामासाठी जेसीबी मशिनच्या साहाय्याने खोदकाम होते. त्यावेळी बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. हिंजवडीत बॉम्ब आढळण्याची ही तिसरी घटना ठरली आहे.
हा बॉम्ब पूर्णपणे गंजलेला असून, त्याची लांबी एक फूट व ४० सेंटीमीटर परीघ आहे. त्याचे वजन सुमारे चार किलो आहे. त्या बॉम्बची पाहणी करण्यासाठी व तो जिवंत असल्यास त्याला डिफ्युज करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी ‘बीडीडीएस’ पथकाला पाचारण केले होते. त्या पथकाने पाहणी करून तो बॉम्ब खड्ड्यात पुरून ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या शेजारील मोकळ्या मैदानात तीन बाय चार फुटाच्या आकाराचा खड्डा खोदून त्याला सुरक्षित ठेवण्यात आले आहे. लष्कराच्या सदर्न कमांडकडे सुपूर्द करण्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार केला जाणार आहे.
बॉम्बपासून नागरिकांच्या जिवाला कोणताही धोका उद्भवू शकणार नाही, असेही हिंजवडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्या काळी हिंजवडी पट्ट्यातील या भागात घनदाट जंगल व निर्जन भाग असल्याने ब्रिटिशांच्या काळात या भागात युद्धसराव केला जायचा. त्यादरम्यान निकामी न झालेले बॉम्ब जमिनीखाली गाडले गेले होते. त्यामुळे खोदकाम करताना वारंवार बॉम्ब आढळून येत आहेत, असेही काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’ला सांगितले.
यापूर्वी सात वर्षापूर्वी व त्यानंतर एकदा असे दोन वेळेस हिंजवडी हद्दीत बॉम्ब आढळून आला आहे.

‘‘आम्ही बीडीडीएस पथकाला पाचारण केले होते. त्यांनी पाहणी केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार तो बॉम्ब पोलिस ठाण्याच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात खड्डा खोदून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. सदर्न कमांडशी पत्रव्यवहार करून, त्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल.
- कन्हैया थोरात,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिंजवडी

फोटोः 05997, 05999

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT