वाकड, ता. ११ : येथील दत्तमंदिरात दत्त जयंतीनिमित्त ८ ते १५ डिसेंबर दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. काकडा आरती, पारायण, हरिपाठ, कीर्तन, भजन, जागर, इत्यादी कार्यक्रम व दररोज सायंकाळी अडीच हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते आहे. रविवारी (ता. १५) सखाराम महाराज गोपाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाला पहाटे काकडा आरतीने सुरुवात होते. त्यानंतर संपूर्ण दिवसभर होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे वाकड परिसरातील नागरिक भक्तिमय व प्रसन्न वातावरणाने मंत्रमुग्ध झाले आहेत. आजपर्यंत विठ्ठल महाराज पैठणकर, नवनाथ महाराज माझीरे, दत्ता महाराज दोन्हे, गणेश महाराज भगत यांच्या कीर्तन सेवेचा लाभ भाविकांना घेतला असून इथून पुढे सुभाष महाराज जाधव, लहू महाराज जमदाडे यांचे व गणेश महाराज कारले यांचे दत्त जन्माचे कीर्तन होणार आहे. स्वरानंद, तळजाई, जिजामाता, शिवांजली, म्हातोबा, सावता महाराज, माऊली इत्यादी महिला भजनी मंडळ, शनिवारी (ता. १४) श्री दत्त जयंतीला १५ हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. यावेळी मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. पहाटे धार्मिक विधिना सुरुवात होईल. एक लाखाहून अधिक भाविक दर्शनाचा लाभ घेतील. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, व्यत्यय येऊ नये म्हणून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नवनाथ तरुण मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी व समस्त वाकड ग्रामस्थ यांनी आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.