पिंपरी-चिंचवड

नेहमी सर्वोत्तम कामगिरी करेन महाराष्ट्र केसरी विजेता मोहोळ याची ग्वाही

CD

हिंजवडी, ता. १८ : ‘‘माझ्या प्रति असलेल्या तमाम कुस्ती प्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करण्यास माझे प्राधान्य असेल. जीवतोड मेहनत घेऊन कायम सर्वोत्तम कामगिरी करेल.’’, अशी ग्वाही महाराष्ट्र केसरी किताब विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने दिली.
हिंजवडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व जांभूळकर कुटुंबीयांच्यावतीने रोख इनाम देऊन मोहोळ याचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना मोहोळ याने वरील ग्वाही दिली. सरपंच गणेश जांभूळकर, हिंजवडी ग्रामपंचायतच्यावतीने १ लाख ५१ हजार रुपये तर माजी सरपंच नामदेव जांभूळकर परिवाराच्यावतीने ५ लाख रुपये, शाल, सन्मानचिन्ह देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
माजी सरपंच विक्रम साखरे, सचिन जांभूळकर, मच्छिंद्र हुलावळे, विशाल साखरे, नामदेव हुलावळे, कृष्णा बुचडे, शिवाजी बुचडे, बाळासाहेब भिंताडे, ॲड. शिवाजी जांभूळकर, गोकुळ जांभूळकर, विलास साखरे, कुंडलिक जांभूळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मंडळी उपस्थित होती.
यावेळी सरपंच गणेश जांभूळकर यांनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करून उत्तम कामगिरीद्वारे मुळशीचे नावलौकिक करावा, अशी अपेक्षा व्यक्त मोहोळ याला भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT