पिंपरी-चिंचवड

अमर्याद संधीचे केंद्र म्हणून इंदिरा संस्थेची ओळख चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार, विद्यापीठाच्या लोगोचे अनावरण

CD

वाकड, ता. ४ : शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य आणि अमर्याद संधींचे केंद्र म्हणून इंदिरा शिक्षण समूहाची मला ओळख आहे. माणसाला माणूस म्हणून परिपूर्ण घडविण्याची क्षमता संस्थेत आहे. शैक्षणिक योगदान वाखाणण्याजोगे आहे म्हणूनच संस्थेला विद्यापीठाची मान्यता देण्यात आली, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ताथवडे येथे शुक्रवारी (ता. ४) काढले.
पुण्यातील इंदिरा शिक्षण समूह आयोजित ‘सुरवात एका नव्या युगाची!’ या सोहळ्यात इंदिरा विद्यापीठाच्या वेबसाइट, लोगो आणि ‘अप युवर गेम’ या टॅगलाइनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर, विश्वस्त सरिता वाकलकर, माजी नगरसेवक राहुल कलाटे, बाबा जाधवराव, वसंत म्हस्के, शार्दूल गांगल, साहिल मेहेंदळे, शान मेहेंदळे, शैक्षणिक सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, राजीव बन्सल, मनीष दालमिया, डॉ. अनघा जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. तरिता शंकर म्हणाल्या, ‘‘दीड वर्षांपूर्वी दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला. इंदिरा विद्यापीठ हे स्वकीय सेंटर, सेंटर फॉर परफॉर्निंग आर्ट, सेंटर ऑफ एक्सलन्स रिसर्च अँड डेटा कलेक्शन, वूमन एम्पॉवरमेंट हा दृष्टिकोन ठेवून निष्ठेने कार्य करेल. आमचा कौशल्य विकासावर भर असेल.’’
डॉ. सिखा मनसिंधू व डॉ. थॉमसन वर्गिस यांनी सूत्रसंचालन केले. कुलगुरू डॉ. रूपा हिरेमठ यांनी आभार मानले.


महिलांना पाच तासांची नोकरी
‘येथून पुढील काळ महिला आणि मुलींचा आहे. घर संसाराचा गाडा रेटता-रेटता शिक्षण, स्किल-बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांना नोकरी करता यावी म्हणून १२ ते ५ अशी ‘पाच तासांची नोकरी’ हा माझा प्रकल्प सुरू आहे. तशी शिफ्ट करण्यासाठी टाटांसह अन्य नामांकित कंपन्या काम करत असल्याने लवकरच हे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.


फोटोः ताथवडे : इंदिरा विद्यापीठाच्या लोगोचे अनावरण करताना मंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी डॉ. तरिता शंकर, सरिता वाकलकर, प्रा. चेतन वाकलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT