पिंपरी-चिंचवड

बेकायदा जोडण्यांमुळेच मैलापाण्याचे लोंढे

CD

वाकड, ता. २४ : कायम दुर्गंधी आणि कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या भूमकर चौक भुयारी मार्गातील पावसाळी वाहनीला महापालिका प्रशासनानेच काळाखडक झोपडपट्टीची मैला वाहिनी जोडली आहे; तर परिसरातील मॉल्स व काही सोसायट्यांनी देखील चोरून मैला वाहिन्या जोडल्याची कुजबूज सुरू आहे. या बेकायदा प्रकारांमुळेच भूमकर चौकात वारंवार मैला पाण्याचे मोठे लोंढे येऊन दुर्गंधी पसरत आहे. मात्र महापालिकेने स्वतः जोड दिल्याचा आरोप फेटाळला आहे.
काळा खडक झोपडपट्टीच्या उघड्या गटाराला जोडलेल्या वाहिनीमध्ये नागरिक कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या, चिंध्या, कचरा, कापडी पिशव्या, उशा असे अनेक प्रकारचे साहित्य टाकतात. त्यामुळे वाहिनी तुंबून त्यातील पाणी बाहेर येते. पण केवळ पाणी बाहेर आले; तर काही वाटत नाही पण वारंवार चौकात मैला पाण्याचे लोंढे किंवा कधी कधी थेट मैला देखील रस्त्यावर येत असतो.
पाऊस असो अथवा नसो बाराही महिने भूमकर चौकात पूर सदृश्य स्थिती असते. पावसाळ्यात मात्र परिस्थिती भयानक होते. गुडघाभर पाणी साचते. वाहनांच्या रांगा लागतात. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या चेंबरमधून कायम मैला पाण्याचा लोंढा रस्त्यावर येतो. इंदिरा शाळाकडे जाणाऱ्या कोपऱ्यावर देखील हाच प्रकार असतो. त्यामुळे चौकात सर्वत्र उग्र दुर्गंधीच दुर्गंधी असते. वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर हेच मैलापाणी उडण्याच्या किळसवाण्या प्रकाराला सर्वांना सामोरे जावे लागते. शुक्रवारी महापालिकेच्या जलनि:स्सारण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंदिरा शाळेकडे जाणाऱ्या कोपऱ्यावरील समस्या काही प्रमाणात सोडविली आहे. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे देखील अधिकारी उपस्थित होते.


पावसाळी वाहिनीला केवळ उघड्या गटाराची वाहिनी जोडली आहे. त्या वाहिनीमध्ये माती, गाळ, काही वस्तू जाऊन त्या तुंबतात. परिसरातील सोसायट्या व मॉल्सना सेफ्टी टॅंकच्या आधारे परवानगी देण्यात आलेली आहे. त्यापैकीच काही जणांकडून चोरून मैला वाहिन्या पावसाळी वाहिनीला जोडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत आम्ही शोध मोहीम राबवू. सोमवारी देखील संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली जाईल.
- अमित दीक्षित, उपअभियंता, जलनि:स्सारण विभाग

गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. स्मार्ट सिटीत शहराचा समावेश असताना वाकडसारख्या प्रगत उपनगरात अशी लाजिरवाणी बाब वारंवार घडणे, भूमकर चौकात प्रवेश करताच आलेल्या पाहुण्यांना व वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात
- सुरेश खरोसे, रहिवासी


पावसाळी वाहिनीला मैला वाहिनी अजिबात जोडलेली नाही. येथील काळाखडक झोपडपट्टीची गटार वाहिनी जोडल्याने झोपडपट्टीचा कचरा, कपडे, राडारोडा येतो आणि वाहिन्या तुंबून ही समस्या उद्‍भवते. आम्ही ती वाहिनी वेळोवेळी साफ करण्यासाठी माणसे नेमली आहेत.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Wedding Card : टीपू सुलतान प्रेरणास्थान, शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका व्हायरल...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३० तास पाणीपुरवठा ठप्प, 'या' सहा विभागातील जलवाहिनी बंद होणार; कधी? वाचा सविस्तर

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते- प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT