पिंपरी-चिंचवड

पायावर अर्धा तास चाक; रुग्णवाहिकेचीही पाठ !

CD

हिंजवडी, ता. २ : भरधाव डंपरने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ती डंपरच्या पुढील चाकाखाली सापडली. मात्र अपघात घडताच चालक पसार झाला आणि तब्बल अर्धा तास तिचा पाय चाकाखालीच अडकून पडला. अक्षरशः ती ‘मला वाचवा’ चा धावा करत होती. मात्र, रुग्णवाहिका, क्रेन आणि पोलिस यंत्रणेची वेळेत मदत न मिळू शकल्याने अति रक्तस्त्राव, सेप्टिक होऊन त्या दुदैवी महिलेचा पाय शस्त्रक्रिया करून खुब्यापासून काढावा लागला. या अपघातात तिला कायमचे अपंगत्व आले. ही ह्दयद्रावक घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी दोनच्या सुमारास ताथवडे येथील भुयारी मार्गा समोर घडली.
स्वरा संजय पवार (वय ३६, रा. रोहन अनंता सोसायटी, ताथवडे) असे त्या तरुणीचे नाव असून त्यांच्यावर थेरगावातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोपी डंपरचालक पवन नागोराव देशमुख (वय २९, रा. सूर्यमुखी गणेश मंदिर, पाडाळे बावधन) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा या दुपारी दोनच्या सुमारास कामावरून घरी जाताना त्यांच्या मुलाची स्कूल बस देखील येते. त्यामुळे त्या मुलाला दुचाकीवरुन घरी घेऊन जात. सोमवारी त्या नेहमीप्रमाणे घरी जात होत्या. मुलाला घेण्याआधी समोरून भरधाव आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. त्याचे पुढील चाक त्यांच्या अंगावर गेले. तेव्हा, डंपर त्याच अवस्थेत सोडून चालकाने पळ काढला. जमलेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी झाले.
रुग्णवाहिका वारंवार फोन करूनही आली नाही. अखेर दोन जेसीबीच्या साहाय्याने डंपरचे चाक वर उचलून त्यांना बाहेर काढण्यात आले. मोटारीतून त्यांना रुग्णालय दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांचा डावा पाय खुब्यापासून काढला. बेदरकार चालकाच्या चुकीमुळे स्वरा यांना कायमचे अधू व्हावे लागले आहे. स्वरा यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य असून त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी त्यांचे शेजारी सरसावले असून शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी सोसायटी रहिवाशांची व भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

हेल्मेटमुळे बचावल्या
स्वरा यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने त्या थोडक्यात बचावल्या. मात्र, त्यांना डावा पाय कायमचा गमवावा लागला. त्या एका जिममध्ये नोकरी करतात. त्यांचे पती इलेक्ट्रिशन आहेत. याबाबत शेजाऱ्यांनी मुलाला घरी नेत त्याला अद्याप काही कळू दिले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ताथवडे, हिंजवडी, पुनावळे, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई या भागात बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम आहे. गेल्या तीन महिन्यांत १२ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. त्यामुळे या बेदरकर अवजड वाहनांना आवरण्याची मागणी रहिवासी करत आहेत.


डंपर, काँक्रीट मिक्सर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करतात. त्यामुळे प्रदूषणातही ही वाढ झाली आहे एकीकडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अपघातांमुळे अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. येथील आरएमसी प्लांटलाच बंदी घालावी, याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. पोलिस तसेच आरटीओ व महापालिका यांनी संयुक्त कारवाई करत बंदोबस्त करावा.
- चेतन भुजबळ, माजी सभापती, शिक्षण मंडळ


आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. वाढत्या विकासकामांमुळे अलीकडे अपघातांत वाढ झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी वाहतूक पोलिस, आरटीओ यांच्यासह संयुक्त मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ठराविक ठिकाणी नाकाबंदी करून अशा अवजड व नियमबाह्य वाहनांवर कारवाई केली जाईल.
- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी

WKD25A08968, PNE25V28034
WKD25A08970

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT