पिंपरी-चिंचवड

पुनावळ्यामध्ये आम्हाला ऑक्सिजन पार्कच हवे

CD

हिंजवडी, ता. २० : पुनावळेतील सर्वे क्रमांक २४ मध्ये ५७ एकरात कमर्शिअल कॉम्प्लेक्स ॲण्ड कन्व्हेंशियल सेंटरचे (आरक्षण क्रमांक ७/९५) आरक्षण प्रस्तावित आहे. ते आरक्षण रद्द करून त्याऐवजी ऑक्सिजन पार्क उभारावे, यासाठी पुनावळेमधील ६५ हाउसिंग सोसायट्या एकवटल्या आहेत. त्यांनी तशी मागणी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे केली आहे. तर पाच हजार नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत.
महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटून ६५ सोसायट्यांचे प्रतिनिधी व पुनावळेकर ग्रामस्थांच्यावतीने हरकतपत्र व सह्यांचे निवेदन देण्यात आले. सचिन गायकवाड, विक्रम भोसले, सिंटू सिंह, नितेश कुमार यांच्या शिष्टमंडळाने त्यावेळी चर्चा केली. आरक्षण रद्द होऊन जोपर्यंत ऑक्सिजन पार्क होत नाही तोपर्यंत पाठपुरवठा करणार असल्याचा निर्धार सर्व सोसायटीचे अध्यक्ष, प्रतिनिधी आणि समिती सदस्यांनी केला.

या सोसायट्यांकडून मागणी...
सिद्धशिला ईला, सोमानी रेसिडेन्सी, माय होम, गोल्डन ट्रेझर, सेंटोसा प्राइड, सूर्या स्काईज, १८ लॅटिट्यूड, १८ लॅटिट्यूड-२, जीके आरकॉन, जीके आरिस, जीके रोझ ॲस्टर, सोमानी ड्रीम होम एडियमविले, लेगसी आयव्ही, लेगसी मिलेनियम, गायकवाड मिरो, मान्या हाइट्स, वर्धमान पाम रोझ, स्मृती गार्डन, द मिरॅकल, भालचंद्र वाटिका, भालचंद्र उपवन, स्टँझा ए, मालपाणी सेरेझा, ट्यूलिप एक्सोटीका, डीएसके कुंजबन, इन्फिनिटी क्यूब, पुणे विले, अतुल्य निर्माण, सारा मेट्रोव्हिले, आदित्य पॅराडाईज, रोज मेन्शन, भुजबळ हाईट्स, गगनगिरी सदन, लीगेसी क्रेस्ट, लीगेसी अर्बानिया, स्कायलिश अव्हेन्यू, यशोन इन्फिनिटी, अयक्यम सोसायटी, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग ए, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग बी, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग सी, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग डी, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग ई, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग एफ, ७ प्लुमेरिया ड्राइव्ह विंग जी, भालचंद्र आकाशवन, सिरोको ग्रँड, इन्फिनिटी वर्ल्ड, इन्फिनिटी प्राइड, लँडब्रेझी, सियोना बिल्डिंग, इन्फिनिटी टॉवर, साई पॅराडाईज, नेक्सस वेस्टप्राइड, श्रेयांश अपार्टमेंट, ४५ शाश्वत एवेन्यू, सिद्धशिला मधुबन, श्रीशा प्राइड

प्रशासकीय आणि व्यावसायिक संकुल (सुपर ऍडमेस्ट्रेटिव्ह कम कमर्शियल कॉम्प्लेक्स) असे ते आरक्षण आहे. त्यामध्ये विविध कंपन्या व शासनाची कार्यालये असणार आहेत. आरक्षण रद्द करण्यासाठी विविध सोसायट्यांची निवेदने व पाच हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकती आम्ही नियोजन समितीकडे पाठवतो. त्यावर अभिप्राय देऊन समिती तो प्रस्ताव शासनाकडे पाठविते. शासन त्यावर योग्य ते निर्णय घेते.
- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग


आरक्षित परिसर वनीकरणाचा आहे. त्यामुळे हे आरक्षण विकसित करताना असंख्य वृक्षांच्या कत्तली होणार आहेत. वनसृष्टी धोक्यात येणार आहे. या भागांत शेकडो मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे आरक्षण रद्द करून वनीकरणाला मोठ्या उद्यानात बदलावे, अशी आम्हा सर्वांची आग्रही मागणी आहे.
- नितेश कुमार, अध्यक्ष, सूर्या स्काय सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT